मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस १३ चे विजेते सिद्धार्थ शुक्ला आज हृदयविकाराचा झटका निधन झाले आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे. मात्र सिद्धार्थचे निधन हे हृदय विकाराच्या झटक्याने झाले आले असले तरी मुंबई पोलिसांनी अद्याप त्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा खुलासा केलेला नाही.
हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, काळ रात्री जेव्हा सिद्धार्थ त्यांचा बीएमडब्ल्यू कारने घरी आला तेव्हा त्याचा गाडीची काच फुटलेली होती. त्यामुळे आता गेल्या रात्री सिद्धार्थचे कोणाशी भांडण वा वाद तर झाला नव्हता ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिद्धार्थचा कुणाशी वाद झाला होता का? यामुळे तो डिस्टर्ब होता का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, मुंबई पोलीसांनी माहिती देताना सांगितले की, सिद्धार्थचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता हे सांगणे कठीण आहे की त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. मेडिकल आणि पोस्ट मार्टम अहवालानंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. अशी पोलीसांनी माहिती दिली आहे.
सिद्धार्थच्या शरीरावर आत्तापर्यंत कोणत्याही जखमा वा व्रण आढळून आलेले नाहीत. पोलिस घाईघाईने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू इच्छित नाही. त्यामुळे त्यांना पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.