क्रिती सेनन सध्या तिच्या “मिमी’च्या रिलीज होण्याचा आनंद सेलिब्रेट करते आहे. आता तिला मधुबाला आणि मीनाकुमारी या भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील दोन महान अभिनेत्रींच्या बायोपिकमध्ये काम करण्याचे स्वप्न पडायला लागले आहे. मधुबाला आणि मीनाकुमारी या हिंदी सिनेमातील दोन दिग्गज अभिनेत्री होत्या. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना विशेष माहिती नाही.
त्यांच्या आयुष्यातील चढउतार आणि फिल्मी करिअरबाबत लोकांना तपशिलाने सांगणे गरजेचे आहे. आपल्याला स्वतःलाही त्यांच्याबद्दल अधिक अभ्यास करावा असे वाटते आहे. म्हणूनच या दोन्ही अभिनेत्रींच्या बायोपिकमध्ये काम करायला आपल्याला नक्की आवडेल, असे क्रिती म्हणाली. मधुबला याचा बायोपिक करण्याची चर्चा काही काळापूर्वी सुरू झाली होती.
मधुबाला यांच्या भगिनी मधुभूषण या या बायोपिकचे प्रॉडक्शन करणार असे समजले होते. मात्र, या संदर्भात नंतर कोणताच अपडेट मिळाला नाही.तर डायरेक्टर तिग्मांशू धुलिया मीनाकुमारीवरील बायोपिक करणार असल्याचेही समजले होते.
लीड रोल विद्या बालन करणार होती. पण नंतर ती या प्रोजेक्टमधून बाहेर पडली. मीनाकुमारी यांच्या जीवनावर एक वेबसिरीज होणार असल्याचेही समजले आहे. जर हे बायोपिक झाले तर कदाचित क्रितीचे स्वप्न साकार होऊ शकेल.