ग्वाल्हेर – विषारी इंजेक्शन घेऊन एका डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. आत्महत्येपुर्वी डॉक्टरने चार पानांची सुसाईड नोट लिहली असून त्यामध्ये सासरे व मेहुणीच्या त्रासाळा कंटाळून डॉक्टरने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
डॉ. गौरव गुप्ता असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थली धाव घेतली असून त्यांना चार पानी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये “मला जगायचं होतं पण त्यांनी मला जगू नाही दिलं” असेही नोटमध्ये लिहले आहे.
डॉ. अनिल गुप्ता मेहुणी नेहा हे त्यांना नसिक त्रास देत होते. शिवाय घटस्फोटाच्या कागदपत्रावर सही करण्यासाठी दबाव आणत होते. तसेच कुटुंबीयांना पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकी देत असल्याने हा त्रास सहन होत नसल्याचे डॉ. गुप्ता यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.