काही मोजकेच चित्रपट असे असतात की जे प्रदर्शनानंतर सुद्धा प्रेक्षकांवर गारुड घालतात. याचा प्रत्यय सध्या पाहायला मिळतोय. २०२० या वर्षातला सर्वात मोठा आणि कदाचित २०२० या वर्षातला शेवटचा मल्टीस्टारर मराठी चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर उचलून धरल. नंतर पुढील २ महिन्यात मार्च मध्ये कोरोना आणि लॉकडाऊन सुरु झालं, ह्या काळात ‘धुरळा’ चित्रपटाची मागणी करणारे अनेक इमेल्स आणि मेसेज झी मराठी वाहिनीकडे आले. आणि प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन ‘दसऱ्याच्या’ शुभ मुहूर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर ला दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वा. या चित्रपटाचा World Tv Premier होतोय.
मागील दिवसांत #पुन्हानिवडणूक? या हॅशटॅगने जबरदस्त धुरळा सोशल मिडीयावर उडवून दिला होता. अर्थात त्याचे पडसाद वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरही दिसले. लाखो व्ह्यूज मिळवणाऱ्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
राजकारणाप्रमाणेच धुरळाच्या गोष्टीत सुध्दा बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत हे नक्की. ‘सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अलका कुबल आणि अमेय वाघ’ या कलाकारांचा कसदार अभिनय आणि दमदार डायलॉग्जची झलक ट्रेलरमधून पहायला मिळालीच आहे. खूप वर्षांनी एक दमदार राजकारणपट येतोय म्हणजे टेलीव्हिजन वर ‘धुरळा’ उडणार हे निश्चितच.