पणजी – सरकार स्थापनेच्या पेचावरून राज्यात उडालेल्या राजकीय धुराळ्यात नेते अडकले आहे तर राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या आपल्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठराविक मराठी कलाकारांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून #पुन्हानिवडणूक? असे पोस्ट केले होते. या कलाकारांच्या हॅशटॅगमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. मात्र ज्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा हॅशटॅग वापरण्यात आला होता, त्याच ‘धुरळा’ या मराठी चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. दरम्यान, डिजिटल प्रभातचे प्रतिनिधी अमोल कचरे यांनी ‘धुरळा’ या चित्रपटाविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक ‘समीर विद्वांस’ संवाद साधला.
गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सगळेच पैलू या टीझरमध्ये उलगडण्यात आले, त्यामुळे आता चित्रपटात काय पाहायला मिळतंय याची उत्सुकता ताणली गेली आहे. ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.