मुंबई – काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांकडून सोशल मीडियावर “#पुन्हानिवडणूक” असं ट्विट करण्यात आलं होतं. निवडणुकी नंतर राज्यात कोणताही पक्ष सत्तास्थापन करू न शकल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
अश्यातच अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक असं ट्विट केलं होतं. मात्र कलाकारांच्या या ट्विटचा अनेक राजकीय नेत्यांनी आणि नेटकऱ्यांनी समाचार घेतला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
दरम्यान, आता #पुन्हानिवडणूक मागचं रहस्य उलगडलं आहे. हा हॅशटॅग “धुराळा” या आगामी मराठी चित्रपटासाठी वापरण्यात आला असून, ३ जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धुरळा चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केलं आहे.
राजकारण. रणधुमाळी. धुरळा.
झी स्टुडीओज् सादर करीत आहे, राजकारणाचा ‘धुरळा’!लेखक: क्षितिज पटवर्धन
दिग्दर्शक: समीर विद्वांस #धुरळा #पुन्हानिवडणूक?#Dhurala #3Jan pic.twitter.com/gk9e3aSRoE— Sai (@SaieTamhankar) November 16, 2019