मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विधानसभेत काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारेंच्या काही विधानांवरून टीका केली. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, आता सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडीओ ट्वीट केले असून त्यावरून फडणवीसांवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना सुषमा अंधारेंच्या काही विधानांवरून टीका केली. “सुषमा अंधारे म्हणतात की ‘राम-कृष्ण थोतांड आहे. सीतामातेला जो सोडून जातो, तो शबरीसोबत बोरं खात बसतो. या देशातील लोक इतके मेरिटवाले होते, की माकडं पूल बांधत होती’. आमच्या रामाबद्दल असं बोललं जातं तेव्हा अपमान होत नाही का”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
देवेंद्रभाऊ वादाला तोंड फुटलेच आहे तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. हे भाजपाचे लोक आहेत की परग्रहावरचे? आणि यावर आपलं नेमकं मत काय आहे?
बाकी तूम्ही माझ्यावर हल्ला करण्याइतके अस्वस्थ झालेलं बघुन आनंद वाटला. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms pic.twitter.com/4nJSmxKWSF— SushmaTai Andhare (@andharesushama) December 27, 2022
त्यांच्या या टीकेला आता पुन्हा एकदा सुषमा अंधारेंनी ट्वीट करून उत्तर दिले आहे. यात, “देवेंद्रभाऊ वादाला तोंड फुटलेच आहे तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. हे भाजपाचे लोक आहेत की परग्रहावरचे? आणि यावर आपलं नेमकं मत काय आहे? बाकी तुम्ही माझ्यावर हल्ला करण्याइतके अस्वस्थ झालेलं बघून आनंद वाटला”, असे म्हणत अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच या व्हिडीओमध्ये भाजपा खासदार नरेंश अग्रवाल यांनी संसदेत केलेल्या एका वक्तव्याचाही समावेश आहे. “व्हिस्की में विष्णू बसे, रम में श्रीराम, जीन में माता जानकी और ठर्रेम में हनुमान सियावल राम चंद्र की जय”, अशी घोषणाच अग्रवाल देताना या व्हिडीओत दिसत आहेत.