मुंबई : राज्यसभा निवडणुकीत काही काळासाठी महाविकास आघाडी सहावी जागा जिंकेल अस वाटत असताना भाजपने बाजी मारली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेलं चातुर्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. फडणवीसांवर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील फडणवीसांचे कौतुक केलं. त्यात आता चंद्रकांत पाटलांची भर पडली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला’ ही शरद पवारांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आमचे देवेंद्रजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे, असही पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील पुढं म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे रसायनच वेगळं आहे. देवेंद्रजींच्या मनात काय सुरू आहे, हे माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्याला देखील कळणं अवघड असल्याची कबुली पाटील यांनी दिली.
‘माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला’ ही @PawarSpeaks यांची प्रतिक्रिया बोलकी आहे… आमचे @Dev_Fadnavisजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे. @BJP4Maharashtra
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 11, 2022
भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अत्यंत कुशलतेने राज्यसभा निवडणूक हाताळली. त्यामुळे अशक्यप्राय अशा सहाव्या जागेवर भाजपने बाजी मारली असून कोल्हापूरचे धनंजय महाडिक विजयी झाले.