मुंबई : भाजपा तर्फे देशभरात ‘मोदी@९’ हे अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने अमित शहांची महाराष्ट्रातील पहिली सभा शनिवारी नांदेड मध्ये पार पडली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’अमित शाह यांची नांदेडला आम्ही सभा ठेवली तर अशोक चव्हाण म्हणाले, त्यांना निवडून येण्याची खात्री नाही म्हणून ते सभा घेत आहेत. अशोकराव असं नाहीय. आमच्याकडे 9 वर्षात केलेलं काम सांगण्यासारखं काम आहे, म्हणून आम्ही सभा घेतोय…अशोकराव तुमची मजल 2जी, 3जी आणि सोनियाजी याच्यापलीकडे गेलीच नाही. असा खोचक टोलाही त्यांनी मारला
फडणवीस पुढे म्हणाले,’तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही. म्हणून तुम्ही सभा घेण्याची हिंमत करत नाहीत. आम्ही बघा अमित शाह यांची सभा घेतली. नजर जाईल तिथपर्यंत जनतेचा महासागर बघायला मिळतोय”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.’ दरम्यान अशोक चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात येवून फडणवीस यांनी चव्हाणांवर निशाणा साधला आहे.