Rishabh Pant fined 12 lakhs : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रविवारी आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. दिल्लीने विशाखापट्टणममध्ये आयपीएल 2024 मधील पहिला विजय नोंदविला, परंतु चेन्नई सुपर किंग्जविरुद्धची एक चूक रिषभला महागात पडली.
दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेविरुद्ध स्लो ओव्हर-रेट ठेवला, ज्यामुळे पंतला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. ऋषभ पंत सध्याच्या आयपीएलमधला दुसरा कर्णधार ठरला आहे, ज्याला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएल 2024 चा 13 वा सामना रविवारी विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अनोखे साम्य निर्माण झाले. दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेत पहिला विजय नोंदवला तर चेन्नई सुपर किंग्जला पहिला पराभव स्वीकारावा लागला. | Rishabh Pant fined 12 lakhs
चेन्नई सुपर किंग्ज आपला पहिला होमग्राउंडबाहेर खेळत होते. सध्याच्या आयपीएलमधला कोलकाता नाईट रायडर्स हा एकमेव संघ आहे ज्याने होमग्राउंडबाहेर एक सामना जिंकला आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरने आरसीबीचा पराभव केला. | Rishabh Pant fined 12 lakhs
संघाचा हा पहिलाच गुन्हा असल्याने पंत आणि गिल यांना १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या चुकीची पुनरावृत्ती झाल्यास कर्णधारांना 24 लाखांचा दंड ठोठावला जाईल. याशिवाय संघातील इतर सदस्यांनाही मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात येणार आहे.
संघाने तिसऱ्यांदा चूक केल्यास कर्णधाराला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. संघातील इतर सदस्यांना मॅच फीच्या 50 टक्के दंड आकारला जाईल. | Rishabh Pant fined 12 lakhs
“पहिल्या डावात खेळपट्टी..” CSK च्या पराभवाबाबत कॅप्टन ऋतुराज गायकवाडने स्पष्टचं सांगितलं
MI vs RR : वानखेडेवर भिडणार मुंबई आणि राजस्थान.. ‘जाणून घ्या’ खेळपट्टी कोणाला देणार साथ