संगमनेर -तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपाचे उपसरपंच प्रदीप गुंड यांना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
उपसरपंच गुंड (वय 33) हे काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. ही वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी तत्काळ त्यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर उपचारार्थ संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मयत असल्याचे घोषित केले. यानंतर कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पिंपळगाव देपा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले. यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे.