रांची – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडे त्याच्याच गावातील मुलींनी एक अनोखी मागणी केली आहे. या मुली क्रिकेटवेड्या असून रांचीत फक्त मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण अकादमी नाही.
बाढू या रांचीतील एका गावातील या मुली भारतीय क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मेहनत घेत आहेत. मात्र, केवळ मुलींना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळेल अशी एकही अकादमी नाही. त्यामुळे धोनीनेच यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या मुलींनी केली आहे.
या सगळ्या मुली झारखंडमधील वेगवेगळ्या गावातून आल्या आहेत. त्यांचा दिवस शेतात राबण्यात जातो. मात्र, यातूनच वेळ काढत त्या क्रिकेटही खेळतात. मात्र, या खेळातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे अशी इच्छा त्यांनी धोनीकडे व्यक्त केली आहे.