वाघोलीत लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करा !

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

वाघोली : पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून वाघोली गाव ओळखले जात असून या गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाघोली आणि पंचक्रोशीतील गावांसाठी लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करण्याची मागणी तसेच जास्तीच्या  वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून तातडीने लसीकरण वाघोलीतील वाड्या-वस्त्यांवर तसेच सोसायटीमधील नागरिकांसाठी करण्यासाठी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर लोकसभेचे  खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर  हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील ( गवळी) यांनी दिली आहे.

हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच वसंतकाका जाधवराव, उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी उपसरपंच समीर भाडाळे,ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे यांनी वाघोली तालुका हवेली येथील  नागरीकांचे जास्तीत जास्त लसीकरण तातडीने होण्यासाठी राष्ट्रवादीच्या राज्यपातळीवर नेत्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

लसीकरण लवकर होऊन नागरिक  कोरोना मुक्त  होतील यासाठी जादा कर्मचारी आणि गर्दी न होता लसीकरण त्वरित व्हावे यासाठी स्वयंसेवी  संस्था,  सामाजिक संस्था यांची योग्य ती मदत घेऊन तातडीने जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देऊन लसीकरण प्रभावी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य पातळीवरील राष्ट्रवादीचे नेत्यांकडे केली आहे.

जास्तीत जास्त लसीकरणामुळे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोलाची मदत होणार आहे त्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या  मार्गदर्शनाखाली गावोगावी लसीकरणाचा लाभ तातडीने  मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे राष्ट्रवादीचे नेते  राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.