राजकुमार रावबरोबर 100 टक्‍के समरस झाले नाही- श्रुती हासन

मुंबई – बहेन होगी तेरी मध्ये श्रुती हासन आणि राजकुमार रावची जोडी होती. पण या सिनेमात राजकुमार रावबरोबर 100 टक्के समरस होऊन काम करू शकले नसल्याची खंत श्रुती हासनने बोलून दाखवली आहे.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना कोणत्या सेलिब्रिटीबरोबर काम करायला आवडेल? असे विचारले असता श्रुतीने राजकुमार रावचे नाव सांगितले. पण “बहेन होगी तेरी’च्या सेटवर त्याच्याबरोबर समरस होऊन काम करू न शकल्याचेही तिने सांगितले.

नंतर राजकुमार रावबरोबरची केमिस्ट्री चांगली जमली होती, हेही तिने सांगितले. “बहेन होगी तेरी’ हा 2017 चा रोमॅंटिक कॉमेडी होता. यामध्ये श्रुतीला आपल्या शेजाऱ्याबद्दल वाटणारे प्रेम ती बोलू शकली नव्हती.

या सिनेमावर विश्‍लेषकांनी खूप टीका केली होती आणि व्यावसायिक निकषावरही हा सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. राजकुमार रावच्या यशस्वी सिनेमांच्या यादीतून हा सिनेमा वगळला गेला. पण श्रुतीची तर सुरुवातच होती. त्यात अपयश आल्यामुळेही तिला निराशा वाटणे स्वाभाविक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.