पुणे – करोनामुळे एसटीची वाहतूक बंद असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) राज्य शासनाने 1 हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस संघटनेचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केली.
कर्मचाऱ्यांचे वेतन, डिझेल खर्च व इतर खर्च भागविण्यासाठी शासनाकडील विविध सवलतीच्या प्रतिपूर्तीची थकबाकीची रक्कम तत्काळ द्यावी यासह विविध मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.