नवी दिल्ली – देशभरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत रुग्णांचा आकडा २९ हजारावर पोहचला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती भवनातील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. अशातच नीती आयोगातही करोनाचा शिरकाव झाला असून एक अधिकारी पॉझिटिव्ह असल्याचे समजत आहे.
माहितीनुसार, दिल्लीस्थित नीती आयोगाच्या बिल्डिंगमधील उच्चस्तरीय अधिकारी करोनाबाधित आढळला आहे. यानंतर नीती आयोगाची बिल्डिंग पूर्णतः सॅनिटाइज करण्यात आली असून दोन दिवसासाठी सील करण्यात आली आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे.
One officer in NITI Aayog has tested positive for #COVID19.
The necessary protocol is being followed, including sealing of the building for two days for thorough disinfection and sanitisation: Ajit Kumar, Deputy Secretary (Administration), NITI Aayog. #Delhi pic.twitter.com/zgj7Da5Rss— ANI (@ANI) April 28, 2020
दरम्यान, देशात दिवसाला कोरोनाचे साधारण 1500 रुग्ण मिळत आहेत. 3 मे नंतर हे प्रमाण वाढेल मात्र, 12 मे नंतर हा आकडा पुन्हा खाली येईल आणि 16 मे नंतर देशात एकही करोना रुग्ण आढळणार नाही असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी केला होता. हा दावा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.