पुणे – शाळा-महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया, शुल्क आकारणीसंदर्भात अवास्तव मागणी करीत काही सामाजिक व राजकीय संघटनांकडून शहरातील शैक्षणिक संस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार घडत आहे.
शाळा-महाविद्यालयांमध्ये बेकायदेशीरपणे घुसून प्रशासनाला मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे. संबंधीत संघटनांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली.
आमदार सिद्धार्थ शिरोळे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष ऍड.एस.के.जैन, सचिव मिहीर प्रभुदेसाई, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे राजु सहस्त्रबुद्धे, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसाटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेर्लेकर, भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकीर्डे, शाळांचे विधी सल्लागार ऍड.विक्रम देशमुख, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी (हुजुरपागा), सेवासदन, कन्नड संघ, प्रगकती पथ फाऊंडेशन यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापकांनी सोमवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले.