पिंपरी (प्रतिनिधी) – सायकलस्वार प्रशांत कुमार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी इंडो ऍथलेटिक्स सोसायटीतर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी साडेसहा वाजता कात्रज देहूरोड बायपासवर पुनावळे येथे सायकलस्वार प्रशांत कुमार यांच्या अपघाती मृत्यू झाला. या प्रकणी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी व शहरातील इतर संघटनांचे सदस्य एकत्र येऊन रावेत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना निवेदन दिले. त्यात दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
या वेळी प्रशांत कुमार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सायकलिस्ट व धावपटू यांच्या सुरक्षिततेसाठी शपथ घेण्यात आली. सर्वांना मंगळवारी (दि. 30) पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे सकाळी दहा वाजता जमावे यासंदर्भात विनंती करण्यात आली.
या वेळी गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, गिरीश परदेशी, गिरीराज उमरीकर, अजित गोरे, असीम दरेकर, निलेश घोळवे, डॉ. अजय शर्मा, संदीप परदेशी, अमीर शेख, सुनील चाको, युवराज पाटील आदी उपस्थित होते. या वेळी इंडो ऍथलेटिक्स सोसायटीतर्फे लवकरच रस्ता सुरक्षासंदर्भात सामाजिक जागर पोलीस दलासोबत घेण्यात येईल, असे गजानन खैरे यांनी सांगितले.