नवी दिल्ली- दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत आणखी बिघडली असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. त्यांना करोना झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यांना पूर्णवेळ ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
त्यांना करोनाबरोबरच न्युमोनियाही झाला असल्याचे निदान झाले आहे. अतिदक्षता विभागात त्यांची प्रकृती सुधारली नाही तर त्यांना आणखी चांगल्या सुविधा असलेल्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा विचार आम्ही करीत आहोत, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
बुधवारी जैन यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांचा ताप कमालीचा वाढला आणि ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे