दिल्लीत चोरीच्या संशयातून महिलेची हत्या

नवी दिल्ली – शहरातील महरौली भागात एका भाड्याने राहणाऱ्या महिलेची निघृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. महरौलीच्या एका घरमालकाने त्याच्या कुटुंबियांची मदत घेऊन या भाडेकरू महिलेला मारहाण केली. या मारहाणीमध्येच त्या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी हत्येचा गु्न्हा दाखल करून 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

मंजू गोयल असे मृत महिलेचे नाव आहे. चोरी केल्याचा संशय आल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याची कबुली दिली.मंजू या दिल्लीतील प्रसिद्ध जिंदाल केटरर्स या कुटुंबातील सदस्य होत्या. या केटरर्सचे मालक हे त्यांचे बंधू आहेत. मात्र, त्या आपल्या भावांसोबत न राहता एकट्याच राहत होत्या. परिसरातील लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवण्याचे काम त्या करत होत्या.

महरौलीमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु, त्यांना मार जास्त लागल्याने त्यांचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मंजू यांनी त्यांच्या भावांना फोन करून दिली होती. त्यानंतर त्यांच्या भावांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घरमालक सतीश पावा त्यांची पत्नी सरोज, मुलगा पंकज, सून दीपिका आणि मोलकरीण कमलेश यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×