नवी दिल्ली – देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन कुलगुरू म्हणून प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी ह्या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत.
शांतीश्री धुलीपुडी या पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे प्राध्यापक आहेत. त्यांचा कार्यकाळ पुढील पाच वर्षांचा असेल. तर जेएनयूचे कुलगुरू प्रा. एम जगदेश कुमार आज विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.