JNU Movie : राजकारणाच्या आखाड्यात सतत चर्चेत असणार नाव म्हणजे जेएनयू. JNU ने आजवर अनेक आंदोलने पहिली अनेक वाद-विवाद पाहिले आहेत. मात्र आता सर्वांना JNU मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.आता जेएनयूवर चित्रपट बनणार आहे. दिग्दर्शक विनय शर्मा हा चित्रपट घेऊन येत आहेत. | JNU Movie
या चित्रपटात रवी किशन आणि उर्वशी रौतेला दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ज्यात एका हातात भारताचा नकाशा धरलेला दिसत आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच व्हायरल होत आहे. पोस्टर रिलीजसोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. | JNU Movie
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यावर लिहिले आहे – ‘एखादे विद्यापीठ देश तोडू शकते का?’ या चित्रपटाचे हे पोस्टर पाहता जेएनयूमध्ये अभ्यासाच्या नावाखाली होत असलेले राजकारण या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज सहज बांधला जाऊ शकतो. ज्यामध्ये उर्वशी रौतेला आणि रवी किशन सारखे कलाकार विद्यापीठाच्या राजकारणाचा भाग बनताना दिसणार आहेत. | JNU Movie
उर्वशी रौतेलानेही पोस्टर शेअर केले
अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही या चित्रपटाचे पोस्टर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘शिक्षणाच्या बंद भिंतींच्या मागे देश तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे, डावे आणि उजव्यांमधील वर्चस्वाची ही लढाई कोण जिंकणार ? | JNU Movie
View this post on Instagram
चित्रपटात दिसणार हे स्टार्स
उर्वशी रौतेला आणि रवी किशन व्यतिरिक्त या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, पियुष मिश्रा, रश्मी देसाई, सोनाली सहगल आणि विजय राज यांच्या नावांसह इतर अनेक स्टार्स देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.