नवी दिल्ली – केजरीवाल सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आडकाठी करणारे दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना यांनी आता 244 मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या रोखल्या आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
सक्सेना यांनी दिल्लीतील सरकारी शाळांमधील मुख्याध्यापक आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन वर्षे रिक्त असलेल्या केवळ 126 पदांना मंजुरी दिली असून, बाकीच्या नियुक्त्या त्यांनी अडवल्या आहेत, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, राज्यपालांचे सेवा विभागावर असंवैधानिक नियंत्रण आहे. शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांची एकूण 370 पदे रिक्त आहेत आणि या 370 पैकी फक्त 126 पदे राज्यपालांनी मंजूर केली आहेत.
Maharashtra : मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री शिंदे
उरलेल्यांसाठी त्यांनी आम्हाला अभ्यास करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी सक्सेना यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. कसल्याही कारणास्तव राज्यपालांनी उर्वरित पदांवरील नियुक्त्या थांबवू नयेत, असे आवाहन सिसोदियांनी केले.