चेन्नई – श्री बालाजी मंदिर, तिरुपती येथील सुप्रसिद्ध प्रसादाचे लाडू (मिठाई) आता एका स्वयंचलित यंत्राद्वारे तयार करण्यात येणार असून, भाविकांची वाढती संख्या लाडूची वाढती मागणी, यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापक
धर्मा रेड्डी म्हणाले.
प्रसादाचे दर्जेदार आणि चविष्ट लाडू बनवण्यासाठी 50 कोटी रुपयांचे पूर्ण स्वयंचलित मशीन उभारण्यासाठी रिलायन्स कंपनीने ऑफर दिली असून लवकरच हे मशिन मंदिराच्या आवारात बसवले जाईल. त्यामुळे भाविकांना अधिक स्वच्छ आणि चवदार लाडू मिळू शकणार आहेत. एका दिवसाला किमान 50 हजार लाडू तयार करण्याची या यंत्राची क्षमता असेल.
जानेवारी 2023 मध्ये, 20.78 लाख यात्रेकरूंनी भेट दिली, तर 37.38 लाख यात्रेकरूंनी अन्नप्रसाद घेतला आणि 7.51 मुंडन केले. हुंडीचे संकलन 123.07 कोटी रुपये झाले असून एक कोटी लाडू यात्रेकरूंना वाटण्यात आले आहेत.
तसेच तिरुमला येथे सुरू असलेले अत्याधुनिक संग्रहालय या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. एसव्ही म्युझियम डिसेंबर 2023 अखेर 120 कोटींमध्ये तयार होईल. येथील बाभूळ लागवडीचे कामही वेगाने सुरू आहे.
तामिळनाडू शालेय शिक्षण विभागाने सरकारी शाळांमधील इयत्ता 6-8 च्या विद्यार्थिनींसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 184 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग हा केंद्र सरकारच्या ‘सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग स्कीम’चा एक भाग आहे. राज्यातील एकूण 6,774 माध्यमिक शाळा आणि 5,519 उच्च व उच्च माध्यमिक शाळांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति शाळा 5,000 रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत.