नवी दिल्ली – दिल्लीहून देहरादूनकडे येणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस रेल्वेच्या एका डब्याला आग लागली आहे. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
A fire broke out in the C4 compartment of the Delhi-Dehradun Shatabdi Express today, due to a short circuit. The incident happened near Kansro. All passengers were safely evacuated, no injuries reported: Uttarakhand DGP Ashok Kumar pic.twitter.com/iTIwSkxCWS
— ANI (@ANI) March 13, 2021
इंजीनपासून आठव्या डब्याला आग लागली होती. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर या डब्याला गाडीपासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
या डब्यात 35 प्रवाशी होते. त्यांना दुसऱ्या डब्यात शिफ्ट करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. ही घटना रायवाला आणि कांसरो रेंजच्या दरम्यान घडली.
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कांसरोजवळ घडली. शाॅर्ट सर्किटमुळे दिल्ली-देहरादून एक्सप्रेस मध्ये लागली होती. रेल्वे अधिकारी आणि जीआरपी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.