नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीचा शोधदेखील लावला असल्याचे म्हटले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना सोमवारी रात्री उशिरा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोन कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली होती.
धमकीच्या या कॉलनंतर दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले होते. तपास केल्यानंतर धमकी देणारा आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे.
अरविंद केजरीवाल यांना धमकी देणारा आरोपी ३८ वर्षीय असून तो मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर दिल्लीमधील गुलाबी बाग येथे उपचार सुरू असल्याचे म्हटले जात आहे.