शारजा – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज कोलकाता नाईट रायडर्सशी होत हात करणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झालेल्या दिल्लीचे आव्हान मोडून काढण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांत सरस कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी खेळेल.
दिल्लीने यंदाच्या मोसमात सातत्याने सरस कामगिरी केली व त्यामुळेच ते क्वॉलिफायरच्या पहिल्या लढतीसाठी पात्र ठरला होता. मात्र, त्यांना चेन्नईने पराभूत करत या गटातून थेट अंतिम फेरी गाठली. मात्र, क्वॉलिफायर 2 या गटात दिल्लीला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा पराभव करत कोलकाताने क्वॉलिफायर गटात प्रवेश केला.
आता दिल्ली व कोलकाता यांच्यातील सामनाही असाच रंगतदार ठरण्याची अपेक्षा आहे. बेंगळुरूविरुद्ध जरी विजय मिळवला असला तरीही कोलकाता संघाला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अनेक गोष्टींची चिंता राहणार आहे. त्यांच्याकडे जागतिक कीर्तीचे खेळाडू असले तरीही त्यांच्याकडे सातत्य नसल्याने त्यांना साखळी लढतींमध्ये काही सामने हातातून गमवावे लागले होते.
आजचा सामना
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
सायंकाळी – 7-30
ठिकाण : शारजा, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस 1
दुसरीकडे दिल्लीचा संघ कोलकातापेक्षा जास्त सरस वाटत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने यंदाच्या स्पर्धेत विजेतेपदाचीही दावेदारी भक्कम केली आहे.
कोलकाता संघालाही आपली दावेदारी प्रस्थापित करण्यासाठी दिल्लीच्या आक्रमक फलंदाजांना रोखावे लागेल. सलामीवीर पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, शेमरन हेटमायर व कर्णधार पंत अशी भक्कम फलंदाजी दिल्लीकडे असून त्यांना रोखण्याचे काम कोलकाताच्या गोलंदाजांना करावे लागणार आहे.
शकिब हल हसन, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती व सुनील नरेन अशी कोलकाताची गोलंदाजीही सशक्त असून या सामन्यात दिल्लीचे फलंदाज या शिस्तबद्ध गोलंदाजीचा सामना कसा करतात हे पाहणे रंजक ठरेल.
दुसरीकडे दिल्लीकडेही कोलकातावर वर्चस्व गाजवू शकतील अशी गोलंदाजांची भक्कम फळी आहे. शुभमन गिल, नवोदित स्टार व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, कर्णधार इयान मॉर्गन, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक व शाकिब अल हसन अशी सातत्यपूर्ण फलंदाजी असल्याने दिल्लीच्या गोलंदाजांना हा सामना जिंकण्यासाठी कोलकाताच्या पहिल्या पाच फलंदाजांना स्वस्तात बाद करावे लागणार आहे. दिल्लीकडे महंमद सिराज, डॅनियल ख्रिस्तियन, यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल यांच्या गोलंदाजीचा ताफा आहे.
नरेनच निर्णायक ठरेल
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू सुनील नरेन हाच या सामन्यातील कि फॅक्टर ठरेल. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्धच्याच नव्हे तर यंदाच्या स्पर्धेतील जवळपास सर्वच लढतीत नरेनने आपल्या फलंदाजीने तसेच गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना त्रस्त केले आहे. बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याने चार गडी बाद केले तर फलंदाजीतही चमक दाखवताना संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. आता या सामन्यातही नरेनच दिल्लीसाठी मोठा धोका निर्माण करू शकेल. या सामन्यात त्याचीच कामगिरी निर्णायक ठरेल.