देहूरोडला दोन गटांत हाणामारी

एक जखमी : दुचाकी पेटविली; तलवारीने हल्ला

चार दिवसांत, चार घटना
सोमवारी (दि. 1) शितळानगर येथे 15 जणांमध्ये सशस्त्र हाणामारी, मंगळवारी (दि. 2) शिवाजीनगर येथे प्राणघात हल्ला, बुधवारी (दि. 3) चिंचोली येथे दोन कुटुंबाच्या सहा जणांची हाणामारी झाली. गुरुवारी (दि. 4) श्रीकृष्णनगर येथे 13 जणांचा सशस्त्र हाणामारीची घटना घडली.

देहूरोड – सोडा उधार न दिल्याच्या कारणावरून आठ जणांनी दांडक्‍याने तलवारीने केलेल्या मारामारीमध्ये एक जण जखमी झाला. तर पाच जणांनी केलेल्या हाणामारीत एक दुचाकी पेटविली. याप्रकरणी परस्पर दोन्ही गटाविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. श्रीकृष्णनगर, देहुरोड येथे ही घटना गुरूवारी (दि. 4) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. करण बलवीर सौदे (वय 19, रा. बॅंक ऑफ इंडियाजवळ, श्रीकृष्णनगर, देहुरोड) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्णनगर-देहूरोड येथे केरला लक्ष्मी किराणा दुकानामध्ये करण कामाला आहे. दुकानातील मालक नसताना तिलक सुरेंद्र सौदे याने सोडा उधार मागितला. मात्र, न दिल्याचा राग धरुन तिलक सौदे, राहुल डुलगज, अमन सौदे, साजन मेहरा यासह आणखी तिघे याने लाकडी दांडके, तलवारीने हल्ला केल्याने करणच्या डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली, असे करणने फिर्यादीत म्हटले आहे.

मिरिंडा ऊर्फ विनोद बलवीर सौदे, विकी बलवीर सौदे, टकलू बलवीर सौदे, अमर बलवीर सौदे, करण बलवीर सौदे (सर्व रा. श्रीकृष्णनगर, देहूरोड) यांच्या विरूद्ध साजन मन्नु मेहरा (वय 25, रा. देहुरोड) याने फिर्याद नोंदविला आहे. साजन दुचाकी यावरून जाताना वरील सर्व तिलकला मारहाण केली. तसेच दुचाकी दुचाकी पाडून त्यावर दगड टाकले. त्यानंतर दुचाकी पेटविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.