आळंदी – महिलेचा फोटो आणि अश्लील संभाषण सोशल मीडियाच्या फेक प्रोफाइलवर ठेऊन महिलेची बदनामी केली. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आळंदी परिसरात घडला. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने शनिवारी (दि. 29) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8369687022 व इन्स्टाग्राम अकाऊंट धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी संबंधित मोबाइल व इनस्टाग्राम खात्यावरून फिर्यादी महिलेच्या फोटोचा वापर करून सोशल मीडियावर परस्पर नवीन खाते सुरू केले. तसेच त्यावरून अश्लील फोटो व मजकूर टाकून महिलेची बदनामी केली. महिलेच्या नातेवाइकांना हा प्रकार समजल्यानंतर महिलेला सांगितले. फिर्यादी सोबतच्या अश्लील संभाषणाच्या खोट्या पोस्ट तयार करून त्या आरोपीने व्हायरल केल्या. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी फोन उचलावे म्हणून इन्स्टाग्रामवरून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.