भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. टी-२० विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली आहेत. विराटने पाकिस्तानविरुद्ध नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळी खेळली. यानंतर नेदरलँड्सविरुद्धही काठी खेळपट्टीवर अर्धशतकीय परी खेळली होती. आज पर्थ क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली, पण त्याला केवळ १२ धावा करता आल्या. असे असतानाही विराटने ( Virat Kohli ) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
#INDvsSA । मानलं रे भाऊ! सूर्यकुमारची एकाकी झुंज, टीम इंडियाच्या १३३ धावा
विराट कोहलीने ( Virat Kohli ) टी-२० विश्वचषकमध्ये १००० धावांचा करिष्माई आकडा गाठला आहे. त्याने २४ सामन्यात १००१ धावा केल्या आहेत. हा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय ठरला आहे, तर जगात श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेनंतर दुसरा खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. विराट कोहलीने ८३.४१ च्या सरासरीने आणि १३१.७१ च्या स्ट्राइक रेटने १००१ धावा केल्या आहेत. जयवर्धनेने ३९.०७ च्या सरासरीने आणि १३४.७४ च्या स्ट्राइक रेटने ३१ सामन्यात १०१६ धावा केलेल्या आहेत.
या बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने ३६ सामन्यात ९१९ धावा केल्या आहेत, तर ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावरअसून त्याने ३३ सामन्यात ९६५ धावा केलेल्या आहेत. आजच्या भारत-द.आफ्रिका सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्माने सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धावा केल्या आहेत.
1⃣0⃣0⃣0⃣ runs in the #T20WorldCup! 👌 👌
Well done, @imVkohli! 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6 #TeamIndia | #T20WorldCup | #INDvSA pic.twitter.com/FZN7ZEICxr
— BCCI (@BCCI) October 30, 2022