नगर, (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील शेंडी या गावच्या लोकननियुक्त महिला सरपंच प्रयागा लोंढे यांना झालेल्या मारहाणीचा आणि मराठा समाजाचा कुठला ही संबंध नसतांना सोशल मिडीयावर मराठा समाजाची बदनामी करणार्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद खामकर (पूर्ण नाव माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत रामदास शिवनाथ जरांगे (रा. गावडे मळा, सावेडी) यांनी शुक्रवार (दि. १६) रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रसाद खामकर नावाच्या व्यक्तीने ओबीसी समाज अहमदनगर या व्हाॅट्स अप ग्रृपवर गुरुवार (दि.१५) रोजी रात्री एक मेसेज टाकला. त्यात शेंडीच्या सरपंच प्रयागाताई लोंढे यांना मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंद असतांनाही दुकान चालू ठेवले म्हणून मारहाण करण्यात आली. एका महिलेला मारहाण करणार्या या प्रवृत्तीचा जाहीर निषेध या तसेच शेंडी येथील मराठ्यांचा निषेध असे म्हणून मराठ्यांची सोशल मिडीयावर बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला