मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण इंडस्ट्रीमधील टॉप हिरोईन पैकी एक आहे. त्यामुळे दीपिकाच्या ड्रेसिंगपासून ते तिच्या सोशल मीडियापर्यंतच्या सर्व गोष्टींची मीडियामध्ये जोरदार चर्चा असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. दीपिका पदुकोण व अभिनेता रणबीर कपूर एकेकाळी रिलेशनशीपमध्ये होते. दोघांच्या प्रेमाच्या सगळीकडे चर्चा होत्या व ते लग्नही करतील, असं म्हटलं जात होतं.
मात्र, दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधली, तर रणबीर कपूरने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न केलं. आता रणबीर व दीपिका आयुष्यात बरेच पुढे निघून गेले आहेत. दीपिकाने तर रणवीरसाठी तिच्या मानेवर टॅटूही काढला होता. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधली, तर रणबीर कपूरने आलिया भट्टशी लग्न केलं.
पण दीपिकाच्या मानेवर तिने रणबीरसाठी काढलेल्या टॅटूची आजही सगळीकडे चर्चा होताना दिसत असते. जेव्हा दीपिका आणि रणबीर एकत्र होते तेव्हा दीपिकाने आपल्या मानेवर ‘RK’ नावाचा टॅटू काढून घेतला होता. दरम्यान, आता हे दोघेही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले असले तरी दीपिकाच्या मानेवर आजही ‘RK’ नावाचा टॅटू असल्याचं पाहायला मिळत.
एकदा ‘कॉफी विथ करण’च्या तिसऱ्या पर्वात तिने हजेरी लावली होती. त्यावेळी तिला या टॅटूबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तिने खुलासा केला होता की तिला तिच्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही. असं स्वतः अभिनेत्री म्हणली आहे. यावेळी दीपिका म्हणाली होती, “हे असं काहीतरी आहे, जे मला त्यावेळी योग्य वाटलं होतं आणि मला कधीच पश्चाताप झाला नाही आणि मी तो टॅटू काढून टाकण्याचा कधीही विचार केला नाही. मला माहीत आहे की मीडिया सतत म्हणत आहे मी तो टॅटू काढला आहे. पण तो तसाच आहे आणि तो टॅटू हटवण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही..’