दीपिका पदुकोणच्या “कॉकटेल’ला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने तिने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरच्या आपल्या प्रोफाईलचे नाव बदलले. तिने आपल्या प्रोफाईलचे नाव “वेरोनिका’ असे केले. “कॉकटेल’मध्ये तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे नाव वेरोनिका हेच होते.
View this post on Instagram
Often I’m asked if there is a moment I would like to relive…The answer is YES!🎉 #8YearsOfCocktail
आपल्या इन्स्टाग्राम अणि ट्विटवरच्या फोटोमध्येही तिने बदल केला आहे. तिने या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आपला “कॉकटेल’मधील फर्स्ट लुकचा फोटो अपलोड केला आहे.
या सिनेमात ब्लॅक ऍन्ड ब्रॉन्झ कलरच्या ड्रेसमध्ये ती एका पार्टीत गाणे म्हणताना दिसली होती. त्यावेळी यो यो हनी सिंह आणि जिपी ग्रेवालने म्हटलेले “अंग्रेजी बीट’ गाणे होते.
View this post on Instagram
तोच फोटो दीपिकाने अपलोड केला आहे. “कॉकटेल’मध्ये दीपिकाच्या बरोबर असलेल्या डायना पेंटीनेही “कॉकटेल’च्या 8 वर्ष पूर्ण होण्याचा आनंद सेलिब्रेट केला आहे. तिने या सिनेमातील काही फोटो आणि सीन सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
दिनेश विजन, दीपिका, सैफ अली खान, बोमन इराणी आणि डिंपल कपडिया यांच्या अदाकारीमुळे आपल्याला हा अविस्मरणीय सिनेमा मिळाला. त्यात आपल्याला अविस्मरणीय असे कामही करायची संधी मिळाली, असेही डायनाने म्हटले आहे.