प्रियांका चोप्रा पती निक जोनासबरोबर आपले वैवाहिक आयुष्य मस्त एन्जॉय करते आहे. प्रियांकाने अलिकडेच सासू डेनिस जोनास यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. आपल्या सासूबरोबर तिने एक मस्त फोटो काढून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हा फोटो प्रियांकाने सोशल मिडीयावर शेअर देखील केला आहे आणि या फोटोला एक छानशी कॅप्शनदेखील दिली आहे. “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ममाजी. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि स्नेहाबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही आमच्या बरोबर आहात आणि या वाढदिवसाचा आनंद आम्ही तुमच्याबरोबर मिळून साजरा करू शकतो आहोत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे.’
असे तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 2018 मध्ये प्रियांका आणि निकचे लग्न झाले. तेंव्हापासून हे दाम्पत्य न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या दोन्ही ठिकाणी थोडा थोडा काळ रहात आले आहेत. त्यातच प्रियांका तिच्या सिनेमांच्या प्रमोशन, शुटिंग आणि प्रॉडक्शनच्या कामासाठी अधुन मधून मुंबईला येत जात असते. त्यामुळे सासूचा सहवास तिच्यासाठी थोडा दुर्मिळच झाला आहे.
यावेळी मात्र वाढदिवसाच्य निमित्ताने तिने सासूला आपल्याकडे बोलावून घेतले आहे. आता आणखी काही दिवस तिची सासू तिच्याकडेच राहणार आहे.