सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याला आज एक महिना पूर्ण झाला. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. त्याच्या मृत्यूनंतर महिन्याभराने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याच्या बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि एक अत्यंत इमोशनल पोस्टही लिहीली आहे. “सुशांतनेच आपल्याला प्रेमात विश्वास दाखवायला शिकवले होते.
दररोज मी सुशांतकडून काही ना काही शिकले आहे. आता तू जाऊन एक महिना झाला. पण तू आयुष्यभराचे प्रेम देऊन गेलास. आता मी अनंतापर्यंत तुझ्याशी जोडली गेली आहे.’ असे रियाने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे.
या पोस्टला अनेकांनी पसंत केले. पण या फोटोवरून रियाला काही जणांनी ट्रोल देखील केले आहे. सुशांतबरोबरच्या संदिग्ध रिलेशनशीपवरून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रियाची ही पोस्ट म्हणजे संधिसाधूपणा असल्याची टीका काही जणांनी केली आहे.
एकाने तर म्हटले आहे की जेंव्हा सुशांत जिवंत होता, तेंव्हा तू त्याला सोडून निघून गेली. आता तो गेल्यावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते आहेस. तर काही जणांनी तिला पब्लिकचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोमणाही मारला आहे.