Kajol : साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे.तसं पाहिलं तर रश्मिकाचे जितके चाहते वाढले आहेत तितकेच द्वेष करणारेही उघड्यावर आले. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल (Deepfake Video) करण्यात आला. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला. ज्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे प्रकरण शांत होत नाही तोच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा (Kajol) डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काजोलचा अश्लिल व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काजोलचा अश्लिल व्हिडिओ बनवण्यात आला आहे. यात काजोल कॅमेरासमोर कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काजोलच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. वास्तविक व्हिडिओत दिसणारी मुलगी ही काजोल नाहीए, ती एक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंजर असल्याचं सांगितलं जात आहे.
तीने आपला कपडे बदलतानाचा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला होता. हा व्हिडिओ जून महिन्यात सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. सायबर गुन्हेगारांनी या व्हिडिओत तंत्रज्ञानाच्या मदतीने सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंजर मुलीचा चेहरा हटवत त्या जागी काजोलचा दाखवला आहे.