World Cup Final 2023 Indian Cricket Teams Reached Ahmedabad : एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवार, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. स्पर्धेची पहिली फाइनलिस्ट टीम इंडिया अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता टीम अहमदाबादला पोहोचताच हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दी झाली.
टीम इंडिया अहमदाबादला पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चाहत्यांची चांगलीच गर्दी दिसत असून एका बाजूने टीमची बस येताना दिसत आहे. टीमची बस पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. चाहत्यांची उत्सुकता आणि जल्लोष 👇👇👇👇 व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
Team India have reached Ahmedabad.
– Time to win the World Cup. 🏆🇮🇳pic.twitter.com/rzTTIVbJnT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 16, 2023
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने अहमदाबादला पोहोचली आहे. मेन इन ब्लू (Team India) संघाला 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी हातात घेऊन पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. भारतीय संघाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. आता टीम इंडियाला तिसर्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होताना चाहत्यांना नक्कीच आवडेल.
दरम्यान, या स्पर्धेच्या लीग टप्प्यात अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात एकूण 4 बाद 397 धावा केल्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी संघाकडून शतके झळकावली होती. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला 48.5 षटकांत सर्वबाद 327 धावांच करता आल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.