टोकियो – जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपूष्टात आले आहे. भारताचा स्टार खेळाडू एच. एस. प्रणोय यालाही स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. आशियाई स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकलेल्या प्रणोयला या स्पर्धेत तैपेयीच्या चु तीयान चेनकडून 21-19, 16-21, 19-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
पाठदुखीमुळे प्रणोयला सतावले होते. त्याला आशियाई स्पर्धेनंतर याच कारणाने दोन स्पर्धांमधून माघारही घ्यावी लागली होती. यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या प्रणोयवरच भारताच्या सर्व आशा केंद्रित झाल्या होत्या.
आता पुढील काळातील स्पर्धांसाठी तो उपलब्ध असेल का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. महिला गटात पी. व्ही. सिंधूलाही यंदाच्या मोसमात सातत्याने अपयश येत असल्याने अनेक स्पर्धांमधील भारताचे आव्हान संपूष्टात आले होते.