नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू दीपक पुनिया याची जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने ज्युनिअर गटातील वर्षातील ‘सर्वो त्कृष्ट ज्युनिअर कुस्तीपटू’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
It’s a proud moment for Indian wrestling as #DeepakPunia is named Jr. Freestyle Wrestler of the Year. He had a brilliant year becoming the 1st Indian in 18 yrs to win a Jr. World C’ship gold and followed that by winning silver at the Sr. World C’ships. #TOPSAthlete pic.twitter.com/S6xda4EFns
— SAI Media (@Media_SAI) December 17, 2019
पुनियासाठी यंदाचा मोसम खास राहिला आहे. ज्यूनियर गटात जगज्जेतेपद मिळवणारा मागील १८ वर्षातील तो भारताचा पहिला मल्ल ठरला आहे. यानंतर त्याने वरिष्ठ गटात प्रवेश करत तेथेही आपल्या कीमगिरीने छाप पाडली. वरिष्ठ गटातील जागितक अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेत त्याने पदार्पणातच रौप्यपदक पटकावले होते.
त्याने आपल्या पदार्पणातील कामगिरी स्मरणीय करत ८६ किलो वजनी गटात टोकियो आॅलिपिंकमध्येही जागा मिळवली आहे. तसेच ८६ किलो वजनी गटात यूडब्ल्यूडब्ल्यू क्रमवारीत देखील त्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
हा सन्मान प्राप्त झाल्यानंतर पुनिया म्हणाला, ” मी खूप खूश आहे. जगातील अव्वल कुस्तीगरांमधून माझी निवड झाली, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्याकरिता कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट खेळ करण्यासाठी मोठा प्रेरणास्रोत ठरणार आहे.”