मुंबई: 26/11च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला शनिवारी अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत काय करायचे याचा निर्णय केंद्र शासन आणि पोलीस यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणाला अमेरिकेत अटक झाल्यानंतर सह्याद्री गेस्ट हाऊस येथे अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलीस अधिकारी यांच्यात तातडीची बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक तहव्वुर राणा याला अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये अटक करण्यात आली. आता त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
भारताने मुंबई हल्ल्याप्रकरणी याआधीच अमेरिकेकडे प्रत्यर्पणाची मागणी केली होती. याबाबतचं प्रकरण अमेरिकेत अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे अमेरिका राणाला भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो.