नवी दिल्ली : अयोध्या जमीन वादाच्या खटल्यात मुस्लीमांचे पक्षकार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या रविवारी (दि. 17) होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सर न्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायधिशांच्या खंडपीठाने मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला. मशिद बांधण्यासाठी पाच एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले. या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी याचिका दाखल करायची की नाही, याचा निर्णय 17 नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल, असे ज्येष्ठ विधिज्ञ झफरयाब जिलानी यांनी सांगितले. जिलानी यांनीच मुस्लिम पक्षकारांच्या वतीने या खटल्यात काम पाहिले.