हैद्राबाद – तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये काच्चीगुडा स्थानकात दोन रेल्वेंची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
माहितीनुसार, हैद्राबादमध्ये काच्चीगुडा स्थानकात लोकल आणि एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाली. सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रेनला कोणताही संदेश मिळाला नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, य़ा प्रकरणी योग्य ती चौकशी करून रेल्वेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
#UPDATE Hyderabad: 5 injured after 3 coaches of Lingampalli-Falaknuma train and 4 coaches of Kurnool City-Secunderabad Hundry Express derailed, following collision of the two trains at Kacheguda Railway Station, earlier today. Rescue operation underway. #Telangana https://t.co/qW22IvRVPV
— ANI (@ANI) November 11, 2019