अभिनेत्री अनुष्का शर्माने केवळ अभिनय क्षेत्रातच स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करुन दाखवले नाही तर निर्माती म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे. अनुष्काने एनएच 10, फिल्लोरी आणि परी सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता अनुष्काने डिजिटल वर्ल्डमध्ये एन्ट्री करण्याची तयारी केली आहे. अनुष्काने ऍमेझॉन प्राइम व्हिडिओबरोबर एक वेब मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
आजच्याघडीला या वेब सिरिजचा टीजरही रिलीज झाला आहे. अनुष्का शर्माने आपल्या सोशल मीडियावर अनटाइटल्ड शोची झलक देखील सादर केली आहे. ही एक थ्रीलर कहानी असून ती प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.