पुणे(प्रतिनिधी) : मद्यपान करुन गप्पा मारत पायी जाणाऱ्या मित्रामध्ये बाचबाची झाल्यानंतर एकाने त्याच्या मित्राला रस्त्यावर ढकलून दिले. त्याचवेळी तेथून जाणारा भरधाव टेम्पो रस्त्यावर पडलेल्या व्यक्तिच्या अंगावरुन गेल्याने गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यु झाला. ही घटना खराडी येथील झेन्सोर आयटी पार्क येथे सोमवारी रात्री 10 वाजता घडली.
गजानन भुजंग कदम (वय 32, रा. खराडी) असे मृत्यु झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. याप्रकरणी किसन साळवे (वय 39) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन हाउदलाल जब्बू साह ( वय 40, रा. खराडी) यास अटक करण्यात आली. तर अनोळखी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.