पुणे (प्रतिनिधी) – भाजी खरेदी करून घरी परत जात असताना रस्त्यावर सापडलेले पाच हजार रुपये पोलीस मित्राला सापडले. ते त्यांनी प्रामाणिक खडकी पोलीस स्टेशनला दिले. विशाल केदारी असे त्यांचे नाव आहे. ते सामाजिक कायकर्ते आणि पोलीस मित्र आहेत.
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरून ते खडकीकडे चालले होते. त्यावेळी अंडी ऊबवनी केंद्राच्या सिंग्नलजवळ त्यांना पैसे सापडले. त्यांनी ते जवळील सिग्नलवर थांबलेल्या वाहतुक पोलिसाला देऊ केली. त्यानंतर त्या वाहतुक पोलिसाच्या सांगण्यावरून खडकी पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदाराकडे जमा केली. प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी विशाल यांचे कौतुक केले. लवकरच पोलीस निरीक्षकांकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.