प्रिय बाबा, तुम्ही आमच्यासाठी…..सुप्रिया सुळे यांचे भावनिक ट्विट

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. यानिमत्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक ट्विट केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, गेली पन्नास वर्षांहून अधिक वर्षे बाबा समाजजीवनात वावरत आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांना बाबांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. बाबांचे आणि माझे नाते कसे आहे याबद्दल त्यांना जाणून घ्यायचे असते. जे सर्वसामान्य घरांतील बाप-लेकीचं नातं असतं,अगदी तसंच हे नातं आहे. त्यात वेगळं असं काहीही नाही. माझ्या अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या कुटुंबात आपल्या समाजजीवनातील व्यस्तता आणलेली नाही.आपले काम आणि कुटुंब यांची सरमिसळ त्यांनी कधीच केली नाही. कुटुंबासाठी त्यांनी नेहमीच वेळ काढून ठेवला. अगदी वेळात वेळ काढून बाबा माझ्यासाठी माझ्यासोबत आले आहेत. माझ्या शाळेतही अगदी मुख्यमंत्रीपदावर असतानाही इतर पालकांप्रमाणे रांगेत उभा राहिलेले आहेत. सत्ता ही क्षणभंगूर असते कायम राहते ती माणूसकी हे तत्त्व त्यांनी आम्हाला आपल्या कृतीतून सतत शिकविलं आहे. त्यांची ही शिकवण अंगी बाणवत आम्ही चालत आहोत. बाबा, माझ्यासाठी माझे रोल मॉडेल आहेत आणि राहतील. उलट यावर्षी त्यांचे हे स्थान आणखी घट्ट झालेय हे नक्की….

प्रिय बाबा, तुम्ही आमच्यासाठी अखंड उर्जेचा स्रोत आहात. तुम्ही आम्हाला विचारांचा उज्ज्वल वारसा दिला आणि त्यानुसार मार्गक्रमण करण्याचं बळ देखील. बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.