पुणे – पवित्र पोर्टलद्वारे सन 2019 मध्ये शिक्षक भरती झाली होती. त्यावेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होण्याच्या कारणास्तव रिक्त राहिलेल्या जागांवर भरती केली जाणार आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थामधील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व खासगी शैक्षणिक संस्थांकरीता मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या उमेदवारांना आता प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी 3 नोव्हेंबर मुदत दिलेली आहे.
विविध कारणास्तव रिक्त झालेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांकडून शिफारस करण्यासाठी पोर्टलवर रिक्त पदांची माहिती संबंधित जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांनी भरलेली आहे. यापूर्वी मुलाखतीसह पदभरतीमध्ये खासगी शैक्षणिक व्यवस्थापनातील केवळ पहिली ते पाचवी या गटातील रिक्त पदांसाठी जाहिरात असलेल्या पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.