खांबोली येथील मोहोळ विद्यालयात सायकल वाटप
पिरंगुट – या भागात शाळा नसत्या तर कित्येक मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. पण शाळा असल्याने मुलीचे शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. डोंगरी व दुर्गम भागासाठी शासनाकडून पटसंख्या निश्चित केली जाते; मात्र आता पटसंख्या टिकवण्यासाठी शाळांना मोठी कसरत करावी लागत आहे. मराठी माध्यमांची शाळा ही चिरकाल टिकणारी असून अशा टिकल्या पाहिजे, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
खांबोली (ता. मुळशी) येथील नामदेवराव मोहोळ विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. तसेच आधुनिक शिक्षणासाठी एलईडी स्क्रीन व 2 संगणकही प्रदान करण्यात आले. त्यावेळी आमदार थोपटे बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे यांच्या प्रयत्नांतून व टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर युवराज पायगुडे यांच्या सहकार्यातून हे साहित्य देण्यात आले.
यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे, दादाराम मांडेकर, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, तात्या देवकर, राहुल जाधव, सुहास भोते, राहुल शेडगे, तालुका महिला अध्यक्ष निकिता सणस, रेखा शिंदे, सविता गवारे, आकाश बुचडे, ईश्वर बुचडे, कृष्णा बुचडे, शरद जांभुळकर, राहुल जांभूळकर, मोहन गोळे, प्रसाद खाणेकर, रोहिदास केमसे, खांबोली सरपंच रुपाली तावरे, श्रीरंग शेळके, मोरेश्वर घारे, विशाल साखरे, शरद जांभुळकर,
निरंजन देव, तुषार माझिरे, अविनाश गवारे, उपसरपंच हनुमंत बारकर, कुमार शेडगे, योगेश पापळ, गुलाब लेणे, प्रियांका गायकवाड, सूर्यकांत पारखी, हनुमंत कवितके, नीता शितोळे, रेश्मा कुंभार, सरपंच कैलास गायकवाड, स्वप्नील कुंभार, शिवाजी खेंगरे, तुकाराम खेंगरे, संतोष खेंगरे, माजी सरपंच मनीषा खेंगरे, माजी सरपंच भाग्यश्री देवकर, ललित शिंदे, विलास केमसे, तुषार बोडके, साहेबराव जाधव, बळीराम मालपोटे तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिवाजी बुचडे म्हणाले, विद्यार्थिनींची पायपीट पाहून ती थांबवण्यासाठी सायकल वाटप घ्यायचं सुचलं. तसेच सोबत उद्योजक विठ्ठल पारखी यांच्या प्रयत्नांतून एलईडी स्क्रीन तसेच 2 संगणकही प्रदान करण्यात आले. आमदार थोपटे म्हणतात त्यांच्या वाढदिवसाला अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजपयोगी गोष्टी करा. त्यामुळे हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला.
इंग्रजी शाळेत शिकल्यावरच आपल्या मुलांना जास्त ज्ञान येत हा पालकांचा गैरसमज आहे. याउलट इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुष, ऐतिहासिक लोकं, तसेच मराठी भाषेतील काही जड शब्द व ग्रामीण भागातील शब्दही माहीत नसतात. तर मराठी शाळेत शिकलेली कित्येक मुलं आता चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. त्यामुळे आज या शिक्षकांचं होणारं कौतुक हे अभिमानस्पद आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून नामदेवराव मोहोळ ही संस्था कोणतीही फी घेत नसून, शाळेतून विद्यार्थी घडवण्यासाठीच काम करत आहे.
– अशोक मोहोळ, माजी खासदार
पिंपळोली, आंधळे, कातरखडक या गावातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले असून भविष्यात विद्यार्थ्यांनाही कॉंग्रेस पदाधिकारी सायकल वाटप करतील. दुर्गम भागातील शाळांना सर्वतोपरी सहकार्य करायचं काम कॉंग्रेस पक्ष करत आहे.
– गंगाराम मातेरे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष