मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र अनेक कलाकरांनी या मालिकेला रामराम केला. मुख्य भूमिकेत असणाऱ्या दयाबेन अर्थात दिशा वकानीने 2017 मध्ये प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही. अनेकांनी तिला मालिकेत पुन्हा परतण्याची मागणी केली. परंतु अद्याप तिचे मालिकेत पुनरागमन झाले नाही. मात्र आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री दिशा वकानीने प्रेग्नेंसीच्या कारणाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतल्यानंतर ती पुन्हा मालिकेत परतेल अशी चाहत्यांना आशा होती. अखेर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. दिशा वकानी मालिकेत कमबॅक करत असल्याचं समोर आले आहे. यापूर्वी मालिकेचे निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत असल्याची माहिती समोर येत होती. मात्र आता दिशा पुन्हा येणार असल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री दिशा वकानी येत्या दिवाळीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत कमबॅक करू शकते. पण अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सध्या जेठालालला दयाबेनची खूप आठवण असल्याने सुंदरने दया लवकरच गोकुळधाममध्ये दिसणार असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, ही मालिका सोडल्यानंतर अनेक कलाकारांनी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेवर लैंगिक छळाचा आरोप केला तर कोणी सेटवर अपमानास्पद वागणुक मिळाल्याचा आरोप केला. मात्र या सगळ्यात आता दयाबेन परत येणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.