दुस-या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया १ बाद ३१२
ब्रिस्बेन : पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातील पाकिस्तानच्या २४० या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सलामीवीर डेविड वाॅर्नरच्या नाबाद दीडशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात दुस-या दिवसअखेर १ बाद ३१२ धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. तसेच पाकिस्तानच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येवर ७२ धावांची आघाडी घेतली आहे.
A day of complete dominance by Australia as they finish at 312/1, already 73 runs ahead. Warner led the way for the hosts with a masterful 151*, while Burns (97) and Labuschagne (55*) chipped in. #AUSvPAK Scorecard ⬇️https://t.co/0d3zlDrR8C pic.twitter.com/bqOR6XTrM9
— ICC (@ICC) November 22, 2019
दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मैदानावर मार्नस लबुशेन नाबाद ५५ आणि डेविड वाॅर्नर नाबाद १५१ धावांवर खेळत होते. दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिला गडी जो बर्न्स रूपाने गमावला. जो बर्न्सला यासिर शाहने ९७ धावांवर त्रिफळाचित केले.
तत्पूर्वी, पाकिस्तानचा पहिला डाव गुरूवारी २४० धावांमध्ये संपुष्टात आला. पाककडून असद शफीफने सर्वाधिक ७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टाॅर्कने सर्वाधिक ४ तर पॅट कमिन्सने ३, जोश हेझलवूडने २ आणि नाथन लाॅयनने १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ८७ षटकांत १ बाद ३१२. (जो बर्न्स ९७, मार्नस लबुशेन नाबाद ५५, डेविड वाॅर्नर खेळत आहे १५१, यासिर शाह १०१/१) पाकिस्तान : पहिला डाव : सर्वबाद २४०.